तुमची शेती, आमचे मार्गदर्शन

तुमची प्रगती, शाश्वत शेती आणि योग्य पीक पोषण, हाच आमचा ध्यास!

पिकांची वाढ आणि शेतकऱ्यांची प्रगती हेच आमचे ध्येय

आम्ही शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, उत्तम गुणवत्ता आणि शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय देण्यास वचनबद्ध आहोत. दररोज नाविन्य, सुधारणा आणि शाश्वत भविष्य घडवणे हेच आमचे ध्येय आहे.

नाविन्यपूर्ण उपाय

प्रत्येक पिकाच्या गरजांसाठी

जगभरातील सर्व हरित क्षेत्रांसाठी आम्ही संपूर्ण वनस्पती पोषण उपायांची श्रेणी देतो. आमच्या संशोधन व विकासामुळे आधुनिक आणि प्रभावी तंत्रज्ञान विकसित झाले आहे, ज्यामुळे तुम्ही कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकता. तुमचे पीक कोणतेही असो, तुमच्या पिकांच्या गरजेनुसार योग्य कृषी उपाय आम्ही प्रदान करतो.

आमचे ब्रँड जाणून घ्या

प्रत्येक वापर पद्धतीसाठी

योग्य खत आणि पोषण उपाय
अधिक जाणून घ्या

शाश्वत भविष्यासाठी एकत्रितपणे वाटचाल

जागतिक खत उत्पादक म्हणून, आम्ही शाश्वत शेतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांसोबत काम करतो. रेस्पॉन्सिबल केअर ग्लोबल चार्टरच्या तत्त्वांचे पालन करताना आणि जागतिक जी.ए.पी सोबत भागीदारी करून, सुरक्षित व शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देतो.

आमची जागतिक टीम तुमच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून कार्य करते

जागतिक स्तरावर कृषी, अन्न आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून, ICL अत्याधुनिक संशोधन व विकास सुविधांचा वापर करून शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करते. पीक पोषण क्षेत्रातील पुरवठादार म्हणून आमची खासियत म्हणजे आमची टीम थेट शेतात येऊन तुमच्या पिकांच्या गरजेनुसार योग्य खत व्यवस्थापन आणि पोषण योजना तयार करण्यात मदत करते.

तज्ज्ञता

जगातील सर्वात मोठ्या कृषी तज्ज्ञ, संशोधक आणि वनस्पती पोषण तज्ज्ञांच्या नेटवर्कचा लाभ घ्या. संशोधन आणि विकासातील त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वनस्पती पोषण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पना शक्य झाल्या आहेत. या ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग करून आम्ही शाश्वत शेतीसाठी सर्वोत्तम पोषण उपाय विकसित करतो, ज्यामुळे तुम्हाला उच्च गुणवत्ता आणि जास्त उत्पादन मिळवता येते.

भागीदारी

शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी आमच्या ज्ञान आणि अनुभवाचा लाभ घ्या. आमचे सल्लागार तुमच्यासोबत शेतात प्रत्यक्ष काम करून तुमच्या पिकांसाठी योग्य पोषण योजना तयार करतात. या पद्धतीमुळे तुम्हाला दोन फायदे मिळतात स्थानिक परिस्थितीचे ज्ञान आणि जागतिक तज्ज्ञांच्या ज्ञानाचा लाभ

सेवा

दीर्घकालीन यशासाठी गुंतवणूक करणाऱ्या भागीदारासोबत काम करा. आम्ही तुम्हाला आणि तुमच्या शेतीला समजून घेतो. प्रत्येक मजबूत नात्याची पायाभरणी विश्वासावर होते. तुमचा थेट संपर्क तुमच्या ICL प्रतिनिधीशी असतो, त्यामुळे तुम्हाला मिळणारी सेवा तुमच्या पिकांच्या गरजा, हवामान, जमिनीची परिस्थिती आणि अडचणी यानुसार दिली जाते.

जगभरातील कृषी क्षेत्रासाठी विश्वासू साथीदार

जगातील वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर उत्पादन वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही आधुनिक खते आणि नाविन्यपूर्ण पोषण उपाय विकसित करतो, ज्यामुळे तुम्ही निरोगी पिके घेऊ शकता आणि शाश्वत पद्धतीने जास्त उत्पादन मिळवू शकता. शाश्वत भविष्यासाठी कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन.

अधिक जाणून घ्या
शेतकरी

आमच्या प्रत्येक कामात गुणवत्ता, सुरक्षितता आणि शाश्वतता यांना प्राधान्य दिले जाते.

आमच्या प्रत्येक कामात गुणवत्ता, सुरक्षितता आणि शाश्वतता यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. ही आमची बांधिलकी आमच्या संस्थेच्या प्रत्येक विभागात, उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यात आणि पुरवठा साखळीच्या प्रत्येक भागात दिसून येते.

1
गुणवत्ता

गुणवत्ता ही आमची सर्वात महत्त्वाची प्राथमिकता आहे. कच्च्या मालाच्या खाणीतून ते अंतिम उत्पादनापर्यंत, उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात आम्ही कडक गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया पाळतो. त्यामुळे तुम्हाला नेहमी उच्च गुणवत्तेची उत्पादने मिळतात याची खात्री असते.

2
सुरक्षितता

आमची उत्पादने वापरण्यास सुरक्षित असावीत आणि ती योग्य पद्धतीने वापरली जावीत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे आम्ही योग्य कृषी पद्धतींचा प्रसार करतो आणि पिकांच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात खत वापरण्यासाठी योग्य मार्गदर्शन देतो.

3
शाश्वतता

ICL शाश्वत आणि हरित भविष्यासाठी एकत्र काम करण्यावर विश्वास ठेवते. ऊर्जा आणि पाण्याचा वापर कमी करणारे उपाय विकसित करून आणि आमच्या सर्व प्रक्रियांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासून आम्ही पर्यावरणाचे संरक्षण करतो.

भारतीय शेतीसाठी ICL ची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाय जाणून घ्या
अधिक जाणून घ्या