ICL खतांसोबत टोमॅटो पोषकद्रव्य व्यवस्थापनासाठी संपूर्ण मार्गदर्शन

ICL खतांचा वापर करून टोमॅटोसाठीचे संपूर्ण, दिवसनिहाय पोषकद्रव्य व्यवस्थापन वेळापत्रक जाणून घ्या. पोषकद्रव्यांच्या योग्य वापराद्वारे उत्पादनात आणि फळांच्या गुणवत्तेत सुधारणा करा.

18 सप्टेंबर 2025
2मिनिटे
श्री. संजय बिरादार – अ‍ॅग्रोनॉमी लीड, भारत
पुणे, महाराष्ट्र, भारत

या पानावर:

    भारतात टोमॅटो शेती ही सर्वात फायदेशीर भाजीपाला पिकांपैकी एक आहे. पण जास्त उत्पादन आणि उत्तम फळगुणवत्ता मिळवायची असल्यास टोमॅटो पिकाचे पोषकद्रव्य व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टोमॅटोचे झाड वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाते आणि प्रत्येक टप्प्यावर झाडाला वेगवेगळ्या पोषकद्रव्यांची गरज असते.

    ICL मध्ये आम्ही पिकानुसार काही विशिष्ट ग्रेड्स उपलब्ध करून देतो – जसे की र्टीफ्लो टोमॅटो I आणि फर्टीफ्लो टोमॅटो II,  न्यूट्रीवाँट मालिकेसह, फर्टीफ्लो ग्रेड्स आणि आमचे ४‑इन‑१ नैसर्गिक खत – पॉलिसल्फेट जे तुमच्या टोमॅटो पिकासाठी खास तयार केलेले आहे.

    “शेतकऱ्यांना जर पिकाच्या पोषकद्रव्यांची गरज नीट समजली आणि त्यांनी पिकाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले, तर त्यांना अधिक उत्पादन आणि चांगली गुणवत्ता दोन्ही मिळतात” असे आमचे अ‍ॅग्रोनॉमी तज्ज्ञ सांगतात.

    टोमॅटो पिकातील टप्प्यानुसार पोषकद्रव्य व्यवस्थापन

    टप्पा १: रोप अवस्था (७–२५ दिवस)

    उद्देश: मुळांची चांगली वाढ, बळकट रोप, निरोगी शेंडावाढ.
    आवश्यक पोषकद्रव्ये: फॉस्फरस, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशियम.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • बेसल डोस (दिवस १): पॉलिसल्फेट ७५ – १०० किलो/एकर. नैसर्गिकरित्या Ca, Mg, S आणि K पुरवते.
    • फर्टिगेशन (दिवस ७, १५, २५): फर्टीफ्लो ७:५०:७ + २Zn – ५ – ७ किलो/एकर. फॉस्फरस आणि झिंक पुरवण्यासाठी उत्कृष्ट.
    • फर्टिगेशन (दिवस १० आणि २०): फर्टीफ्लो १२:६:२२ + १२CaO – ५ – ७ किलो/एकर. मजबूत मुळे आणि शेंडावाढीसाठी.

    पिकाची सुरुवातीची वाढीची अवस्था अत्यंत महत्त्वाची असते – जर पिकाच्या सुरुवातीच्या रोप अवस्था टप्प्यात पोषकतत्त्वांचा पुरवठा योग्य प्रकारे केला नाही, तर रोपाची वाढ नीट होऊ शकत नाही.

    टप्पा २: कायिक वाढीचा टप्पा (३०–६० दिवस)

    उद्देश: छत्री (कॅनोपी) वाढ आणि संतुलित वनस्पती वाढ.
    आवश्यक पोषकद्रव्ये: नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • फर्टिगेशन (३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६० दिवस): फर्टीफ्लो टोमॅटो I (१५:१०:३२) – ५ – ७ किलो/एकर (प्रत्येक ५ दिवसांनी)
    • फोलिअर फवारणी (३७, ४७, ५७ दिवस): न्यूट्रीवाँट स्टार्टर (११:३६:२४ + ME) – ५ – ७ ग्रॅम/लिटर

    कॅनोपी वाढ संतुलित राहते, अतिरिक्त हिरवी वाढ टळते आणि झाड फुलांसाठी तयार होते.

    टप्पा ३: फुलधारणा आणि फळधारणा (६०–९० दिवस)

    उद्देश: फुलधारणेस सुरुवात, फळधारणा, फुलांची गळ रोखणे.
    आवश्यक पोषकद्रव्ये: पोटॅशियम, कॅल्शियम, बोरॉन, फॉस्फरस.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • फर्टिगेशन (६५, ७०, ७५, ८०, ८५, ९० दिवस): फर्टीफ्लो टोमॅटो II (११:५:३५ + ४CaO) – ५ – ७ किलो/एकर
    • फोलिअर फवारणी (७३ आणि ८७ दिवस): न्यूट्रीवाँट बूस्टर (८:१६:३९ + ME) – ५ – ७ ग्रॅम/लिटर

    हा टप्पा फुलोरा येण्याच्या प्रक्रियेला चालना, फळधारणेत सुधारणा आणि निरोगी नवीन फांद्यांची वाढ सुनिश्चित करतो.

    टप्पा ४: फुलधारणा आणि फळवाढ (९५–१२५ दिवस)

    उद्देश: फळांची वाढ, फळभार व्यवस्थापन.
    आवश्यक पोषकद्रव्ये: पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • फर्टिगेशन (९५–१२५ दिवस, प्रत्येक ५ दिवसांनी): फर्टीफ्लो टोमॅटो II (११:५:३५ + ४CaO) – ५ – ७ किलो/एकर
    • फोलिअर फवारणी (प्रत्येक १० दिवसांनी): न्यूट्रीवाँट फ्रूट (१२:५:२७ + ८CaO + ME) – ५ – ७ ग्रॅम/लिटर

    हा टप्पा निरोगी फळे, एकसमान आकार आणि फळे धरून ठेवण्याची क्षमता सुनिश्चित करतो.

    टप्पा ५: फळधारणा ते परिपक्वता अवस्था(१३०–१५० दिवस)

    उद्देश: फळांचा रंग, गोडवा आणि कडकपणा.
    आवश्यक पोषकद्रव्ये: पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • फर्टिगेशन (१३๐, १४०, १५० दिवस): पेकॅसिड (०:५८:१८) – ५ – ७ किलो/एकर
    • फर्टिगेशन (१३५ आणि १४५ दिवस): फर्टीफ्लो ०:५५:१५ + ५CaO – ५ – ७ किलो/एकर (कॅल्शियमसाठी)
    • फोलिअर फवारणी (१३७ आणि १४७ दिवस): न्यूट्रीवाँट पेकवाँट (०:४९:३२) – ५ – ७ ग्रॅम/लिटर

    हा टप्पा फळांची टिकवणक्षमता, टणकपणा आणि आकर्षक रंग सुनिश्चित करतो.

    टप्पा ६: फळापासून अंतिम परिपक्वतेपर्यंत (१५१–१७५ दिवस)

    उद्देश: टिकवणक्षमता, फळ तडकणे कमी करणे.
    आवश्यक पोषकद्रव्ये: पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम.

    प्रमाण आणि वेळापत्रक

    • फर्टिगेशन (१५५, १६०, १६५, १७०, १७५ दिवस): फर्टीफ्लो पोटॅशियम+ (८:०:४७ + ७S) – ५ – ७ किलो/एकर
    • फोलिअर फवारणी (१५७ आणि १६७ दिवस): न्यूट्रीवाँट पेकवाँट (०:४९:३२) – ५ ग्रॅम/लिटर

    हा टप्पा फळांची गुणवत्ता ठेवण्यास आणि नुकसान कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे फळांना बाजारभाव चांगला मिळतो.

    ICL च्या टोमॅटो खत व्यवस्थापन पद्धतीचे फायदे

    • संतुलित मुख्य + दुय्यम + सूक्ष्म पोषकद्रव्यांचा पुरवठा होतो.
    • ब्लॉसम एंड रॉट, फळफुटी, फुलगळ अशा सामान्य समस्या कमी होतात.
    • फळांचा आकार, रंग, चव, कडकपणा आणि टिकवणक्षमता सुधारतो.
    • प्रत्येक टप्प्यावर योग्य पोषकद्रव्य दिल्यामुळे खर्चाचा उत्तम वापर होतो.
    • पेकॅसिड आणि न्यूट्रीवाँट तंत्रज्ञानामुळे पोषकद्रव्ये झाडात चांगली शोषली जातात.

    ICL च्या पोषकद्रव्य वेळापत्रकासह तुमचे यश

    टोमॅटो शेतीत जास्त उत्पादन आणि चांगली गुणवत्ता मिळवायची असेल, तर प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रमाणात आणि योग्य संतुलनात पोषकद्रव्य देणे आवश्यक असते. रोप अवस्थेत (दिवस ७–२५) पॉलिसल्फेट आणि फर्टीफ्लो ७:५०:७ + २Zn खतामुळे मुळे आणि शेंडा मजबूत होतात. कायिक वाढीच्या टप्पात (दिवस ३०–६०) फर्टीफ्लो टोमॅटो I आणि न्यूट्रीवाँट स्टार्टर दिल्यास झाडाची वाढ संतुलित राहते. फुलधारणा ते फळधारणा (दिवस ६०–९०) या काळात फर्टीफ्लो टोमॅटो II आणि न्यूट्रीवाँट बूस्टर वापरल्यास फुलगळ कमी होते आणि फळधारणा चांगली होते. फळवाढ (दिवस ९५–१२५) या टप्प्यात फर्टीफ्लो टोमॅटो II आणि न्यूट्रीवाँट फ्रूट दिल्यास फळांचा आकार आणि गुणवत्ता सुधारते. परिपक्वता आणि काढणी (दिवस १३०–१७५) या काळात पेकॅसिड, फर्टीफ्लो पोटॅशियम+ आणि न्यूट्रीवाँट पीकवाँट वापरल्याने फळांचा रंग, चव आणि टिकवणक्षमता चांगली राहते.

    संतुलित पोषणामुळेच निरोगी रोपे वाढतात. योग्य वेळी योग्य पोषकद्रव्ये मिळाल्यास तुमचे टोमॅटो पीक तुम्हाला मजबूत रोपे, उत्तम फळे आणि अधिक उत्पन्न देईल.

    ICL चे हे दिवसनिहाय टोमॅटो पोषकद्रव्य वेळापत्रक पाळल्यास शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, उत्तम गुणवत्ता आणि अधिक नफा मिळू शकतो.

    हे पुढे वाचा