ड्रोन स्प्रे तंत्रज्ञान हे खतांची अचूकपणे फवारणी करण्यासाठी वापरले जाणारे एक कार्यक्षम आणि वेगाने लोकप्रिय होत असलेले स्मार्ट शेती तंत्र आहे. विशेष कृषी ड्रोनच्या मदतीने शेतकरी पिकांना नेमक्या ठिकाणी आणि योग्य वेळी खतांची फवारणी करू शकतात.
शेतकरी खत फवारणीसाठी कृषी ड्रोन स्वीकारण्यात अग्रेसर ठरत आहेत. ड्रोन तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगती आणि ड्रोनसाठी विशेष तयार केलेली खते उपलब्ध होत असल्यामुळे हे क्षेत्र वेगाने विस्तारत आहे; आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण करत आहे.
ड्रोनद्वारे खत फवारणीचे फायदे कोणते?
कृषी ड्रोन आणि त्यासाठी विशेष तयार केलेली फवारणीयोग्य खत उत्पादने यांचा एकत्रित वापर शेतकऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे देतो:
- लक्ष्यित फवारणीमुळे अपव्यय कमी होतो
- सेन्सर तंत्रज्ञानामुळे फवारणीचे प्रमाण प्रत्यक्ष क्षणी स्वयंचलितपणे समायोजित होते
- अत्यंत अचूक फवारणीमुळे रनऑफ कमी होतो
- मोठ्या क्षेत्राचे जलद कव्हरेज मिळते
- कमी खर्च; मोठ्या यंत्रांची गरज नसते
- माती घट्ट होणे टाळले जाते
- लहान शेतांसाठी किंवा जिथे जमिनीचा उतार जास्त आहे अशा अवघड भूभागासाठी अत्यंत उपयुक्त
- संसंसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे वाढलेली शाश्वतता.
एकूणच, खत फवारणीसाठी ड्रोनचा वापर पारंपरिक यंत्रांच्या तुलनेत अधिक अचूक, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक ठरतो. तसेच ते अवघड भूप्रदेश, अनियमित आकाराचे शेत किंवा तीव्र उतार असलेल्या क्षेत्रांमध्ये फवारणी प्रक्रिया अधिक सोपी आणि प्रभावी बनवतात.
ड्रोनद्वारे फवारणीसाठी कोणती खते योग्य आहेत?
ड्रोनद्वारे खतांची फवारणी अनेक फायदे देते, परंतु सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी खते योग्य प्रकारे निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रोनसाठी खत निवडताना खालील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
- इतर कोणत्याही खत व्यवस्थापनाप्रमाणेच पिकासाठी योग्य मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म पोषकद्रव्यांचे संयोजन निवडणे महत्त्वाचे आहे. जर तुमच्या पिकांना सूक्ष्म पोषकद्रव्यांची गरज असेल, तर ती समाविष्ट असलेली खते निवडणे आवश्यक आहे.
- बहुतेक ड्रोन द्रव स्वरूपातील खतांची फवारणी करण्यास अधिक योग्य असतात. ग्रॅन्युलर खते (दाणेदार खते) ड्रोनने देणे शक्य नसल्यामुळे पाण्यात विरघळणारी फोलीअर खते ही सर्वात योग्य निवड ठरते.
- ड्रोनची लोड क्षमता मर्यादित असल्यामुळे:
- उच्च सांद्रता असलेली
- अल्प प्रमाणात वापरली जाणारी (Ultra‑Low Volume)
खते निवडल्यास, ड्रोन जास्त क्षेत्रावर फवारणी करू शकतो आणि रीफिल करण्याची गरज कमी भासते.
- कमी प्रमाणात फवारणी करण्यासाठी खताची निवड करताना, पानांची होणारी जळजळ टाळण्यासाठी त्या खताचा ‘क्षार निर्देशांक’ (Salt Index) कमी असणे आवश्यक आहे.
ICL फर्टिड्रोनचे फायदे
ICL फर्टिड्रोन हे ड्रोन फवारणीसाठी विशेष विकसित केलेले उच्च विश्लेषण (high analysis) आणि कमी क्षारता निर्देशांक असलेले वॉटर-सोल्युबल खत आहे. हे अत्यंत सांद्र P & K खत, तसेच बोरॉन, मॅंगनीज आणि झिंक यांसारख्या सूक्ष्मअन्नद्रव्यांनी समृद्ध असून कमी व अतिशय कमी प्रमाणातील फोलिअर फवारणीसाठी खास तयार केलेले आहे.
पारंपरिक फवारणी यंत्राद्वारे साधारणपणे प्रति हेक्टर 200–300 लिटर मिश्रणाची गरज असते, परंतु ड्रोनसाठी विशेष तयार केलेले फर्टिड्रोन द्रावण फक्त 20–50 लिटर/हेक्टर इतक्या अत्यल्प प्रमाणात फवारता येते. ड्रोनद्वारे या अत्यंत सांद्र व समरूप फर्टिड्रोन द्रावणाची फवारणी केल्यास अन्नद्रव्ये अचूक, कार्यक्षम व एकसारख्या प्रमाणात पिकांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे उत्तम पोषण व्यवस्थापन साध्य होते.
कृषी ड्रोनच्या खत फवारणीतील विशेष फायद्यांचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी डिझाइन केलेले ICL फर्टिड्रोन बद्दल अधिक जाणून घ्या आणि अचूक, कार्यक्षम खत व्यवस्थापनाचा अनुभव घ्या.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा
1 ब्रँड आढळले
ड्रोनद्वारे अचूक खत व्यवस्थापनासाठी विशेष खत
फर्टिड्रोन हे ICL चे विशेष वनस्पती पोषण ब्रँड आहे, जे ड्रोन आणि एरियल फवारणीसाठी विकसित केलेले उच्च विश्लेषण, पूर्णपणे विद्रव्य आणि कमी क्षारता निर्देशांक असलेले खत आहे.
ब्रँड पहासंबंधित विषय
1 उत्पादन आढळले
आमच्या तज्ज्ञांशी संपर्क करा
आमचे कृषी तज्ञ नेहमीच सर्वोत्तम पद्धतींवर मार्गदर्शन करण्यास आणि शेतातील समस्यांसाठी योग्य उपाय सुचविण्यास आनंदित असतात. पिके, खतांचे उपाय किंवा एकूणच कृषीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयावर तुम्हाला सल्ला हवा असल्यास आम्ही मदत करण्यास तत्पर आहोत. शेतकऱ्यांसोबत सहकार्य करून अधिक प्रभावी पद्धती आणि उपाय विकसित करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्या उत्पादनांबद्दल सर्वसाधारण सल्ला हवा असल्यास किंवा एखादा विशिष्ट प्रश्न असल्यास ICL ग्रोइंग सोल्युशन्सशी संपर्क साधा.


