कापूस पिकासाठी पोषण व्यवस्थापन मार्गदर्शन

कापूस पिकासाठी खत व्यवस्थापन, सर्वोत्तम पद्धती, योग्य उत्पादने, शेतातील प्रात्यक्षिके आणि अधिक माहिती येथे जाणून घ्या

कापूस लागवडीसाठी मार्गदर्शन (Gossypium spp.)

कापूस हे एक महत्त्वाचे जागतिक पीक असून त्याच्या वाढीवर आणि उत्पादनक्षमतेवर परिणाम करणारी काही वैशिष्ट्ये आहेत. कापसाला खोलवर जाणारी मुख्य मुळे (टॅप्रूट सिस्टीम) असतात, ज्यामुळे जमिनीतील खोल पोषकद्रव्ये शोषून घेता येतात आणि दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढते. कापसामध्ये दोन प्रकारच्या फांद्या असतात खालच्या बाजूच्या वाढीच्या आणि वरच्या बाजूच्या फळधारणा फांद्या, ज्या बोंडांच्या विकासात आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य पोषण व्यवस्थापन, विशेषतः नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) यांसारखी प्रमुख अन्नद्रव्ये, कापसाच्या जोमदार वाढीसाठी अत्यावश्यक आहेत. अन्नद्रव्यांची कमतरता टाळणे आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे हे जास्त उत्पादन आणि उत्तम दर्जा (तंतूंची लांबी, ताकद आणि मायक्रोनियर) मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे. पानं लाल होण्याची समस्या आणि बोंडांची वाढ हे कापसातील महत्त्वाचे वाढीचे टप्पे आहेत. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, सुधारित शेती पद्धती आणि अचूक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कापूस शेती अधिक नफ्याची आणि टिकाऊ बनते.

  • कापूस लागवडीसाठी योग्य खोल जमीन , सुपीक, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध, चांगला निचरा होणारी आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली असावी. कापूस पिकाला जास्त ओलावा आणि पाणथळ परिस्थिती सहन होत नाही.
  • कापूस पिकासाठी जमीन सामान्य ते किंचित क्षारीय (सामू pH ७.० ते ८.०) असणे उत्तम मानले जाते.
  • सामू pH 7.5 पेक्षा जास्त असल्यास बोरॉन (B), तांबे (Cu), लोह (Fe), मॅंगनीज (Mn), स्फुरद (P) आणि जस्त (Zn) यांची कमतरता दिसू शकते. तसेचसामू  pH ५.५ पेक्षा कमी असल्यास स्फुरद (P), मोलिब्डेनम (Mo) आणि कॅल्शियम (Ca) यांची कमतरता होण्याची शक्यता असते.
  • कापूस पिकासाठी योग्य तापमान म्हणजे उगवणीसाठी २०-३०°C, वाढीच्या टप्प्यासाठी २१-२७°C आणि फुलोऱ्यासाठी २१-२५°C असून, पुरेशी मातीतील ओलावा असल्यास कापूस ४३-४५°C पर्यंतचे तापमान काही काळ सहन करू शकतो.
  • मात्र ४०°C पेक्षा जास्त तापमान कापसाच्या वाढीसाठी अपायकारक ठरते, तरीही कापूस काही प्रमाणात दुष्काळ सहन करू शकतो.
  • हवामान आणि पिकाच्या कालावधीनुसार कापसाला साधारणतः ७०० ते १२०० मिमी पाण्याची गरज असते. पेरणीनंतर पहिले ६० – ७० दिवस पाण्याची गरज कमी असते, तर फुलोरा आणि बोंडांच्या विकासाच्या टप्प्यात पाण्याची गरज सर्वाधिक असते. पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन झाल्यास ओलाव्याचा ताण निर्माण होतो, ज्यामुळे फुले गळणे, बोंडांची वाढ नीट न होणे आणि उत्पादन घटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

अन्नद्रव्यांची गरज (क्रॉप ॲडडव्हायझरनुसार)

मुख्य अन्नद्रव्येनत्र (N)स्फुरद (P)पालाश (K)कॅल्शियम (Ca)मॅग्नेशियम (Mg)सल्फर (SO3)
किलो/एकर५५२४३०१५२७
सूक्ष्मअन्नद्रव्येलोह (Fe)जस्त (Zn)बोरॉन (B)तांबे (Cu)मॅंगनीज (Mn)
किलो/एकर१.५६१.२५०.६००.१००.४०

अन्नद्रव्यांची भूमिका

प्रमुख घटकनत्र (N)स्फुरद (P)पालाश (K)कॅल्शियम (Ca)मॅग्नेशियम (Mg)सल्फर (S)
वाढीचा टप्पा++++++++
बोंड विकास टप्पा+++++
तंतूंची गुणवत्ता+++
तंतूंची ताकद+
उत्पादन++++++

अन्नद्रव्यांच्या कमतरता

नत्र (N): नत्राची कमतरता असल्यास झाडांची वाढ खुंटते, पाने फिकट व पिवळी दिसतात, मुळे कमकुवत राहतात, पाने लवकर सुकतात, लवकर फुलोरा येतो, स्क्वेअरिंग व फुलोरा मंद होतो आणि बोंडांची परिपक्वता उशिरा होते.

स्फुरद (P): जुन्या पानांवर कडेकडून सुरुवात होऊन जांभळट-तपकिरी रंग दिसतो आणि शिरांपर्यंत पसरतो. झाडांची वाढ खुंटते.

पालाश (K): जुन्या पानांवर शिरांमधील भाग पिवळा होतो आणि कडेकडून जळल्यासारखे दिसते. पुढे हे भाग सुकून पाने लवकर गळतात.

कॅल्शियम (Ca): लवकर वाढीच्या टप्प्यात कमतरता दिसते. पानांचे देठ वाकतात, कोसळतात आणि वाढीच्या टोकावर विकृत व पिवळी पाने दिसतात. हे लक्षण कोंब आणि खरी पाने दोन्ही टप्प्यांवर दिसते.

मॅग्नेशियम (Mg): जुन्या पानांवर शिरांमधील भाग पिवळा होतो, पण शिरा हिरव्या राहतात. पानांवर लालसरपणा दिसतो, जो प्रकाशसंश्लेषण कमी झाल्यामुळे होतो.

गंधक (S): नवीन पाने पिवळी होतात, तर जुनी पाने हिरवी राहतात. ही लक्षणे नत्राच्या कमतरतेसारखीच दिसतात. झाडे बारीक व कमकुवत राहतात.

जस्त (Zn): झाडांची वाढ कमी होते व झाडे बुटकी राहतात. पानांवर शिरांमधील भाग पिवळा होतो आणि पाने लहान राहतात. खोडातील अंतर कमी होऊन झाड झुडूपासारखे दिसते.

लोह (Fe): वरच्या नवीन पानांवर पिवळेपणा येतो, पण शिरा हिरव्या राहतात. जुनी पाने हिरवी राहतात कारण लोह सहजपणे नवीन भागात जात नाही.

बोरॉन (B): शेंडा वाकडा होतो, वरची पाने विकृत होतात आणि फुले गळतात. पानांच्या देठावर गडद वर्तुळे दिसू शकतात, बोंडे गळतात आणि झाडाची वाढ जास्त होते.

मॅंगनीज (Mn): नवीन पानांवर शिरांमधील भाग पिवळा होतो, कारण मॅंगनीजच्या कमतरतेमुळे उतींमध्ये मॅंगनीजचे सहजपणे वहन होऊ शकत नाही.

तांबे (Cu):तांब्याच्या (Cu) कमतरतेमुळे वनस्पतींमध्ये प्रथिनांच्या संश्लेषणात अडथळा निर्माण होतो, त्यामुळे विद्रव्य नायट्रोजन (soluble-N) संयुगे जास्त प्रमाणात साचतात. अशा वनस्पतींमध्ये क्लोरोसिस (पानं पिवळी पडणे) दिसते आणि तीव्र कमतरतेच्या अवस्थेत लोह(Fe) वनस्पतींमध्ये साठू लागते. तांबे (Cu) शोषण आणि लोह(Fe) शोषण यांच्यात उलटा संबंध आढळतो.

मोलिब्डेनम (Mo): पानांच्या टोकावर लहान सुकलेल्या ठिपक्यांसारखी लक्षणे दिसतात. मोलिब्डेनमची उपलब्धता सामू  (pH) वाढल्यास वाढते, त्यामुळे क्षारीय जमिनीत त्याची कमतरता सहसा कमी आढळते.

कापूस पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन

वाढीचा टप्पाबेसल डोसफवारणीफर्टिगेशन
लागवडीच्या वेळीपॉलिसल्फेट: ७५ किलो
१२:३२:१६ / १०:२६:२६: १०० किलो
स्थापना टप्पान्युट्रीवाँट स्टार्टर : ५ ग्रॅम/लिटर
सिलेक्ट Zn : ०.५ ते १ ग्रॅम/लिटर
फर्टिफ्लो ७:५०:७ + २Zn / फर्टिफ्लो ग्रो १२:३६:६ + ३MgO + ४S : ३ किलो (२ वेळा)
वाढीचा टप्पान्युट्रीवाँट बूस्टर : ५ ग्रॅम/लिटर
सिलेक्ट B : ०.५ ग्रॅम/लिटर
फर्टिफ्लो १२:६:२२ + १२CaO / फर्टिफ्लो ग्रो १२:३६:६ + ३MgO + ४S : ५ किलो (३ वेळा)
फुलोरा टप्पान्युट्रीवाँट फ्रूट : ५ ग्रॅम/लिटर
सिलेक्ट B : ०.५ ग्रॅम/लिटर
मॅगफॉस ०:५५:१८ + ७MgO / फर्टिफ्लो ब्लूम ८:२४:२४ + ४MgO + ६S : ५ किलो (३ वेळा)
बोंड विकास ते परिपक्वता टप्पान्युट्रीवाँट पीकवाँट : ५ ग्रॅम/लिटरपीकासिड / हाय पीक : ५ किलो (२ वेळा)
पोटॅशियम+ : ५ किलो (३ वेळा)

 

प्रश्नोत्तर

इथे कापूस पिकासंदर्भात शेतकऱ्यांकडून आम्हाला मिळणारे काही सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न दिले आहेत.

नियमित माती परीक्षण करणे, योग्य खत व्यवस्थापन करणे आणि अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर सतत लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय संतुलित पोषण व्यवस्थापन राखणे आणि जमिनीचा सामू (pH) योग्य पातळीवर ठेवणे हे कापसाच्या निरोगी वाढीसाठी आणि जास्तीत जास्त उत्पादनासाठी आवश्यक आहे.

कापूस पिकात सर्वात सामान्यपणे दिसणारी कमतरता म्हणजे नत्राची कमतरता आहे. यामध्ये पाने फिकट पिवळसर-हिरवी दिसू लागतात आणि त्यांचा आकार लहान होत जातो.

कापसाच्या वाढीवर विविध पर्यावरणीय घटकांचा परिणाम होतो. कमी रोपसंख्या, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि जास्त प्रमाणात खतांचा वापर यामुळे वाढीच्या फांद्या जास्त तयार होतात, जरी कापूस पिकाचे मुख्य लक्ष फळधारणा फांद्यांवर असते.

मॅग्नेशियम हे कापूस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे, कारण ते क्लोरोफिल (हरितद्रव्य)  निर्मितीत मदत करते, ज्यामुळे प्रकाशसंश्लेषण सुरळीत होते आणि झाडांची वाढ चांगली होते. तसेच ते विविध जैविक प्रक्रियांमध्ये सक्रियता वाढवते. मॅग्नेशियममुळे पानांचा लालसरपणा कमी होतो आणि झाडे हिरवी व निरोगी राहतात.

मॅग्नेशियम हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे, कारण ते क्लोरोफिलच्या(हरितद्रव्य) निर्मितीत मुख्य भूमिका बजावते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया सुरळीत चालते. मॅग्नेशियमची कमतरता असल्यास झाडांची वाढ खुंटते आणि प्रकाशसंश्लेषण कमी होते, विशेषतः कापूस पिकात मॅग्नेशियम स्थिर झाल्यामुळे ही समस्या अधिक दिसू शकते. तसेच मॅग्नेशियम एन्झाइम प्रणाली सक्रिय ठेवते, पानांचा लालसरपणा टाळते आणि झाडांची एकूण वाढ सुधारते.

नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K), बोरॉन (B), कॅल्शियम (Ca) आणि मॅग्नेशियम (Mg) ही अन्नद्रव्ये कापसातील बोंड निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. नत्र झाडांची वाढ सुधारते, स्फुरद फुलांच्या निर्मितीस मदत करते, पालाश बोंडांच्या विकासासाठी आवश्यक आहे, बोरॉन परागण प्रक्रियेस मदत करते आणि कॅल्शियम बोंडांची मजबुती वाढवते.

संतुलित पोषण व्यवस्थापनासाठी काही अन्नद्रव्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. पालाश (K) पेशींचा विस्तार वाढवून बोंडांचा आकार आणि विकास सुधारतो. कॅल्शियम (Ca) बोंडांची भिंत मजबूत करते, ज्यामुळे कुजण्याचे प्रमाण कमी होते आणि वजन वाढते. मॅग्नेशियम (Mg) प्रकाशसंश्लेषण सुधारून अप्रत्यक्षपणे बोंडाचा आकार वाढवण्यास मदत करते. बोरॉन (B) परागण प्रक्रियेस मदत करून बोंडांची संख्या, वजन आणि आकार वाढवण्यास सहाय्य करते.

गंधक हे कापूस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य असून ते प्रथिने आणि अमिनो आम्लांच्या निर्मितीत मदत करते. ही घटकद्रव्ये कापूस बियाण्यांच्या निर्मिती, आकार आणि वजन वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. तसेच गंधकामुळे प्रजनन प्रक्रियेला चालना मिळते, ज्यामुळे बियाणे अधिक मोठे आणि भरदार होतात.

कापूस पिकात मुख्यतः दोन प्रकारच्या फांद्या आढळतात. खालच्या बाजूच्या वाढीच्या फांद्या या मोनोपोडियल प्रकारच्या असतात, ज्या मुख्य खोडाची वाढ पुढे चालू ठेवतात. तर वरच्या बाजूच्या फळफांद्या या सिम्पोडियल प्रकारच्या असतात, ज्यामध्ये प्रत्येक फांदीवर शेवटी फुल येऊन त्यापासून बोंड तयार होते, तसेच त्याखाली पान आणि पुढील वाढीसाठी कळी असते.

कापूस पिकाला मुख्य मुळांची प्रणाली असते. ही मुळे खोलवर जात असल्यामुळे झाडांना जमिनीच्या खालच्या थरातील पाणी आणि अन्नद्रव्ये मिळवता येतात. त्यामुळे कापूस पिक दुष्काळाच्या परिस्थितीतही टिकून राहते आणि झाडांची एकूण वाढ व आरोग्य सुधारते.

कापूस पिकातील गुणवत्तेचे काही महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

  • तंतूंची लांबी: कापसाच्या तंतूंची लांबी हा गुणवत्ता ठरवणारा महत्त्वाचा घटक आहे. लांब तंतू अधिक चांगल्या दर्जाचे मानले जातात.
  • मायक्रोनियर मूल्य: मायक्रोनियर हे तंतूंची बारीकपणा आणि परिपक्वता दर्शवते. याचा सूत तयार करण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
  • तंतूंची ताकद: तंतूंची मजबुती वस्त्रांच्या टिकाऊपणासाठी महत्त्वाची असते. ती g/tex या एककात मोजली जाते.

कापूस उत्पादनावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

  • बोंडांची संख्या: प्रति क्षेत्रफळातील बोंडांची संख्या उत्पादनावर थेट परिणाम करते.
  • बोंडाचे वजन: प्रत्येक बोंडाचे सरासरी वजन उत्पादन वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
  • लिंट उत्पादन: कापसाच्या तंतूंचे (lint) प्रति एकर किंवा हेक्टर मिळणारे प्रमाण हा महत्त्वाचा उत्पादन घटक आहे.
  • सीड कापूस उत्पादन: यात तंतू आणि बियाणे दोन्हींचा समावेश होतो, त्यामुळे एकूण उत्पादनाचे योग्य मोजमाप मिळते.
  • एकूण उत्पादन: प्रति क्षेत्रफळ मिळणारे एकूण कापूस उत्पादन, जे कापूस शेतीच्या यशाचे मुख्य मोजमाप आहे.

कापसाच्या लागवडीसाठी चार प्रमुख प्रजाती आहेत: गॉसिपियम आर्बोरियम, गॉसिपियम हर्बेशियम, गॉसिपियम हिर्सुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्स. जगात भारत हा एकमेव देश आहे जिथे या चारही प्रजातींची व्यावसायिक पातळीवर लागवड केली जाते.

कापूस पिकाबद्दल आणखी काही प्रश्न आहेत का?

संबंधित उत्पादने

आपल्या कापूस पिकासाठी शिफारस केलेली उत्पादने

फर्टीफ्लो

गंधकयुक्त पोटॅशियम समृद्ध खत

पोटॅशियम+ 08-00-47+7S खत

08-00-47 +TE उत्पादन पहा

फर्टीफ्लो

कॅल्शियमच्या अतिरिक्त सामर्थ्यासह संतुलित NPK खत

12-6-22+12CaO खत

12-06-22 उत्पादन पहा

फर्टीफ्लो

पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी प्रभावी पोषण

ग्रो 12-36-6+3MgO+4S खत

12-36-6 +TE उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

पोषक तत्वांच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी पर्णीय खत

पीकवाँट 00-49-32 खत

उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

अधिक फळ उत्पादनासाठी पर्णीय खत

फ्रुट 12-05-27+8CaO खत

12-5-27 उत्पादन पहा

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा