31-11-11 खत

पौष्टिक नायट्रोजनसह पिकांना सक्षम पोषण

31

N

11

P2O5

11

K2O

TE

टेकलीफ ३१-११-११ हे प्रीमियम पाण्यात पूर्ण विरघळणारे पर्णीय खत आहे, जे नायट्रोजन तसेच इतर मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता टाळण्यास मदत करते. विशेषतः ताणग्रस्त किंवा कमकुवत वाढीच्या परिस्थितीत, जिथे मुळांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषण कठीण होते (उदा. थंड व ओलसर हवामान किंवा जमिनीचा उच्च सामू (pH)), तेथे उच्च नायट्रोजन जलद हिरवळ आणि वाढ प्रदान करते. उच्च शुद्धतेसाठी सर्वोत्तम दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर केला जातो, ज्यामुळे टेकलीफ ३१-११-११ थंड पाण्यातही पूर्णपणे विरघळते. त्यामुळे पिकांना जलद प्रतिसाद मिळतो आणि फवारणी अडथळ्याचा धोका राहत नाही. उच्च नायट्रोजनयुक्त हे उत्पादन विविध पीक संरक्षण फवारण्यांशी सुसंगत आहे.

  • पूर्ण विरघळणारे नायट्रोजन प्रदान करून उत्कृष्ट शोषण सुनिश्चित करते
  • प्रतिकूल वाढीच्या परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करते
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची दीर्घकाळ उपलब्धता सुनिश्चित करते

खुल्या शेतातील वापरासाठी प्रति हेक्टर २००–६०० लिटर पाण्यात ३–५ कि.ग्रॅ. खत विरघळवावे.
हरितगृह (Greenhouse) वापरासाठी ०.३% द्रावणाची शिफारस केली जाते.

वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी करावी. परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात आणि उत्पादनांचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
उच्च दाबाखाली फवारणी करावी.
2
अनेक बुरशीनाशके/कीटकनाशकांसोबत मिसळता येते. अधिक माहिती व शिफारसींसाठी आमच्याशी संपर्क साधा.
3
रसायनांसोबत मिश्रण करताना मोठ्या प्रमाणावर वापरण्यापूर्वी लहान प्रमाणात चाचणी घ्यावी. २- ३ दिवसांत प्रतिसाद तपासा.
4
प्रतिकूल परिस्थितीत (उदा. तीव्र सूर्यप्रकाश, दुपारचे जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन कालावधी) फवारणी टाळावी.
5
अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.

डोस कसा मोजावा?

उदाहरण १:
१०० लिटर पाण्यासाठी १:२० कार्यकारी द्रावण तयार करायचे असल्यास,१०० ला २० ने भागा.
उत्तर ५ येईल, म्हणजे १०० लिटर पाण्यासाठी ५ कि.ग्रॅ. खत लागेल.

उदाहरण २:
१५० लिटर पाण्यासाठी १:१५कार्यकारी द्रावण तयार करायचे असल्यास, १५० ला १५ ने भागा.
उत्तर १० येईल, म्हणजे १५० लिटर पाण्यासाठी १० कि.ग्रॅ. खत लागेल.

  • ICL चे डी.पी.आय तंत्रज्ञान नैसर्गिक उत्तेजक म्हणून कार्य करते, जी प्रकाशसंश्लेषण सुधारते तसेच क्लोरोफिलचे प्रमाण, पानांचा आकार आणि वजन वाढवते. यामुळे पिकांची वाढ आणि अन्नद्रव्य शोषण विशेषतः नत्र व स्फुरद यामध्ये सुधारणा होते. स्वतंत्र अभ्यासांनुसार इतर खतांच्या तुलनेत याची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे दिसून आले आहे.

    अधिक जाणून घ्या
  • एम-७७ तंत्रज्ञान “मुळांच्या क्षेत्राला सक्रिय करते” आणि अन्नद्रव्यांच्या शोषण क्षमतेत प्रभावी वाढ करण्यास मदत करते. पीटर्स प्रोफेशनलच्या उत्पादनांमध्ये क्लोरीन, कार्बोनेट्स किंवा सल्फेट्स यांसारखे कोणतेही क्षार नसतात. त्यामुळे कमी EC पातळी असूनही पोषण पुरवठ्याची कार्यक्षमता उत्तमरीत्या सुधारते.

    अधिक जाणून घ्या

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

अधिक जाणुन घ्या

इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

न्युट्रीवाँट®

पोषक तत्वांच्या वाढीसाठी आणि जास्त उत्पादनासाठी पर्णीय खत

पीकवाँट 00-49-32 खत

उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

पर्णीय फवारणीसाठी खत

स्टार्टर 11-36-24 खत

11-36-24
उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

फुलोऱ्याच्या टप्प्यासाठी पर्णीय खत

बुस्टर 08-16-39 खत

8-16-39
+TE

उत्पादन पहा

न्युट्रीवाँट®

अधिक फळ उत्पादनासाठी पर्णीय खत

फ्रुट 12-05-27+8CaO खत

12-5-27
उत्पादन पहा