महाराष्ट्रात पॉलिसल्फेटमुळे अधिक जाड ऊस
उसाचे वजन
गाव: आंबळे, तालुका: शिरूर, जिल्हा: पुणे, राज्य: महाराष्ट्र 2020
उसाचे वजन
मुख्य निष्कर्ष
सध्याच्या शेतकरी पद्धतीच्या तुलनेत, स्टँडर्ड पॉलिसल्फेटच्या वापराद्वारे ICL पद्धतीने उसाच्या गुणवत्ता व उत्पादन घटकांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवली. कांड्यांच्या संख्येत सरासरी ४२% वाढ झाली, तर उसाच्या घेरात २५% वाढ नोंदवली गेली. तसेच, उसाचे वजन तब्बल ६०% अधिक आढळले.
उद्दिष्ट
उसाच्या वाढ, गुणवत्ता आणि उत्पादन घटकांवर पॉलिसल्फेटच्या परिणामाचे मूल्यमापन करण्यासाठी
चाचणीची माहिती
चाचणीचे स्टेशन
गाव: आंबळे, तालुका: शिरूर, जिल्हा: पुणे, राज्य: महाराष्ट्र
पीक
ऊस
मूल्यांकन
• फुटव्यांची संख्या
• गाळपासाठी योग्य उसांची संख्या
• कांड्यांची संख्या
• उसाचा घेर
• उत्पादन
उपचार
- शेतकरी पद्धत: २९३N : १६३P : १६३K : ४५S (युरिया ५०० कि.ग्रॅ. + १०:२६:२६ – ६२५ कि.ग्रॅ. + एलिमेंटल सल्फर ५० कि.ग्रॅ.) / हेक्टर
- ICL पद्धत: २९३N : १६३P : २३२K : ६९S : ६२CaO : २१MgO (युरिया ५०० कि.ग्रॅ. + १०:२६:२६ – ६२५ कि.ग्रॅ. + पॉलिसल्फेट ३७५ कि.ग्रॅ.) / हेक्टर
उपचार
- शेतकरी पद्धत: २९३N : १६३P : १६३K : ४५S (युरिया ५०० कि.ग्रॅ. + १०:२६:२६ – ६२५ कि.ग्रॅ. + एलिमेंटल सल्फर ५० कि.ग्रॅ.) / हेक्टर
- ICL पद्धत: २९३N : १६३P : २३२K : ६९S : ६२CaO : २१MgO (युरिया ५०० कि.ग्रॅ. + १०:२६:२६ – ६२५ कि.ग्रॅ. + पॉलिसल्फेट ३७५ कि.ग्रॅ.) / हेक्टर
निकाल

शिरूर, महाराष्ट्र येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान ऊस उत्पादनात २७% वाढ आढळली.
ICL पद्धतीमध्ये फुटव्यांची संख्या १९, गाळपयोग्य उसांची संख्या २० आणि कांड्यांची संख्या २० होती; तर शेतकरी पद्धतीमध्ये अनुक्रमे १०, ११ आणि १४ होती. ICL पद्धतीमध्ये ऊस उत्पादन १९० मेट्रिक टन/हेक्टर होते, तर शेतकरी पद्धतीमध्ये ते १५० मेट्रिक टन/हेक्टर होते. प्रति हेक्टर अतिरिक्त उत्पन्न रु. ८४,०००/- मिळाले असून MCBR ७ नोंदविण्यात आला.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा
इतर चाचण्या पहा
ऊसाची उंची
पॉलिसल्फेट वापरामुळे उंच व जोमदार ऊस
गाव : तिर्हे, तालुका : उत्तर सोलापूर, जिल्हा : सोलापूर, राज्य : महाराष्ट्र., 2020
उसाचे वजन
पॉलिसल्फेटमुळे अधिक जाड ऊस
गाव: आंबळे, तालुका: शिरूर, जिल्हा: पुणे, राज्य: महाराष्ट्र, 2020
द्राक्षांचे उत्पादन
द्राक्ष उत्पादनात वाढ
गाव: बोरी, तालुका: इंदापूर, जिल्हा: पुणे, महाराष्ट्र, 2020