पीकासिड 00-60-20 खत

पिकांना पाण्यात विद्रव्य फॉस्फरस व पोटॅशियमची गरज असताना उत्कृष्ठ पर्याय

0

N

60

P2O5

20

K2O

पीकासिड ०-६०-२० हे ICL चे अत्यंत आम्लीय (सामू (pH) = २.२), पूर्णपणे पाण्यात विद्रव्य फॉस्फरस व पोटॅशियम खत आहे. हे विशेषतः चुनखडीयुक्त मातीसाठी आणि/किंवा उच्च बायकार्बोनेट असलेल्या सिंचन पाण्यासाठी फर्टिगेशन वापरासाठी तयार केलेले आहे. पीकासिडमध्ये अँटी-क्लॉगिंग क्रिया आणि आम्लीकरण क्षमता आहे, ज्यामुळे सिंचन प्रणाली अडथळेमुक्त राहते. हे सिंचन पाण्याचा सामू (pH) कमी करते, त्यामुळे अवक्षेप (तळाशी साचणे) तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि सिंचन व्यवस्था स्वच्छ राहते. यामुळे पारंपरिक फॉस्फोरिक आम्ल वापरण्याची गरज कमी होते आणि फर्टिगेशन प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित व परिणामकारक बनते. सहज विरघळणारे असल्यामुळे खुल्या शेतातील तसेच मातीविरहित पिकांसाठी फर्टिगेशन प्रणालीमध्ये हे आदर्श आहे. त्याच्या आम्लीय गुणधर्मांमुळे कॅल्शियम व मॅग्नेशियमसोबत टँक मिक्समध्येही वापरता येते. हे कमी सोडियमयुक्त, क्लोराईडमुक्त असून २०°C तापमानावर ६७० ग्रॅम/लिटर पाण्यात उच्च विद्राव्यता दर्शवते.

पीकासिड तंत्रज्ञान

हे तंत्रज्ञान फॉस्फोरिक आम्लाचे फायदे आणि कार्यक्षमता यांना घन स्फटिक (क्रिस्टलाइन) खताच्या सुरक्षितता व सुलभतेसोबत एकत्र आणते. पीकासिड उत्पादन वापरल्यामुळे शेतीमध्ये तांत्रिक आम्लांच्या पारंपरिक वापराची गरज कमी होते, ज्यामुळे खत व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि परिणामकारक बनते. याच्या आम्लीय गुणधर्मांमुळे पीकासिड सिंचन प्रणालीमध्ये अडथळे कमी करण्यास मदत करते तसेच अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते. ICL त्यांच्या अनेक पाण्यात विद्रव्य खतांमध्ये पीकासिड तंत्रज्ञानाचा वापर करते

पीकासिड तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घ्या

  • फॉस्फरस आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत
  • आम्लीकरण परिणामामुळे लाईनमध्ये अडथळे निर्माण होण्यापासून संरक्षण व फर्टिगेशन प्रणाली स्वच्छ ठेवण्यास मदत
  • सहज आणि जलद विरघळणारे

स्टॉक सोल्यूशनसाठी शिफारस केलेले विरघळण्याचे प्रमाण:
१०० लिटर पाण्यासाठी १०–१५कि.ग्रॅ.

किमान प्रमाण१० कि.ग्रॅ./एकर
कमाल प्रमाण२५ कि.ग्रॅ./एकर

वापरण्याचे प्रमाण किंवा इतर कोणतेही बदल करण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणात चाचणी घ्या. परिस्थिती भिन्न असू शकते आणि आमच्या उत्पादनांचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्याने, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
फर्टिगेशनसाठी योग्य.
2
याचा आम्लीकरण परिणाम फर्टिगेशन लाईन्समध्ये अडथळे होण्यापासून प्रतिबंध करेल आणि मातीतील द्रावणाचा सामू (pH) स्तर नियंत्रित ठेवेल, ज्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण सुधारेल.
3
बायकार्बोनेट HCO3 चे प्रमाण कमी करायचे आहे त्यानुसार, पीकासिड पुरेसे ठरू शकते आणि अतिरिक्त आम्लीकारकांची गरज भासणार नाही.
4
पीकासिडचा आम्लीकरण परिणाम प्रभावी आहे: 0.२४ ग्रॅम १ mmol (६१ मी.ग्रॅ ) HCO₃ बफर करू शकते किंवा १ ग्रॅम ४.२ mmol (२५६ मी.ग्रॅ ) HCO₃ बफर करू शकते.
5
पीकासिडचा थोडक्यात वापर करून पाईप्स स्वच्छ करता येतात. द्रावणात ३.५ ते ५ कि.ग्रॅ./m³ पीकासिड मिसळा आणि प्रणाली १५ मिनिटे चालवा. त्यानंतर १५ मिनिटे स्वच्छ पाण्याने प्रणाली धुवा.
6
अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.

मुख्यतः फर्टिगेशन वापरासाठी शिफारस केलेले

 

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

अधिक जाणुन घ्या

पीकची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य पीक खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

पीक

सर्वाधिक फॉस्फरस आणि पोटॅशियमची उपलब्धता

हाय पीक खत

0-44-44
उत्पादन पहा

पीक

मॅगफॉससह पिकांची दमदार सुरुवात करा

मॅगफॉस 00-55-18+7MgO खत

0-55-18
+TE

उत्पादन पहा

पीक

विविध पिकांसाठी पूर्णपणे पाण्यात विद्रव्य खत

मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0-52-34 खत

0-52-34
उत्पादन पहा

आणखी विषय पहा