मॅगफॉस 00-55-18+7MgO खत

मॅगफॉससह पिकांची दमदार सुरुवात करा

0

N

55

P2O5

18

K2O

7

MgO

मॅगफॉस 0-55-18+7MgO हे प्रीमियम दर्जाचे, पूर्णपणे पाण्यात विद्रव्य खत असून पिकांना उच्च फॉस्फरस आणि मॅग्नेशियम पुरवते. ICL च्या सर्वाधिक सघन फॉर्म्युलेशन्सपैकी एक असल्यामुळे हे पिकांना सुरुवातीपासूनच जोमदार वाढ देते आणि क्लोरोफिलचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. ICL च्या विशेष तंत्रज्ञानामुळे मॅगफॉस पूर्णपणे क्लोराईड आणि सोडियममुक्त आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे खत मिळते. आम्लीय गुणधर्मांमुळे मॅगफॉस काकडी, मिरची आणि टोमॅटो यांसारख्या मॅग्नेशियमची जास्त गरज असलेल्या पिकांसाठी आदर्श ठरते.

पीकासिड तंत्रज्ञान

हे तंत्रज्ञान फॉस्फोरिक आम्लाचे फायदे आणि कार्यक्षमता यांना घन स्फटिक (क्रिस्टलाइन) खताच्या सुरक्षितता व सुलभतेसोबत एकत्र आणते. पीकासिड उत्पादन वापरल्यामुळे शेतीमध्ये तांत्रिक आम्लांच्या पारंपरिक वापराची गरज कमी होते, ज्यामुळे खत व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि परिणामकारक बनते. याच्या आम्लीय गुणधर्मांमुळे पीकासिड सिंचन प्रणालीमध्ये अडथळे कमी करण्यास मदत करते तसेच अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते. ICL त्यांच्या अनेक पाण्यात विद्रव्य खतांमध्ये पीकासिड तंत्रज्ञानाचा वापर करते

पीकासिड तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घ्या

  • उच्च फॉस्फरस आणि मॅग्नेशियमयुक्त अत्यंत प्रभावी विद्रव्य खत
  • उच्च शुद्धतेचे प्रमाण
  • वनस्पतींमधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवते
  • सहज आणि जलद विरघळणारे

स्टॉक सोल्यूशनसाठी शिफारस केलेले विरघळण्याचे प्रमाण:
१०० लिटर पाण्यासाठी १०–१५ कि.ग्रॅ.

किमान प्रमाण१० कि.ग्रॅ./एकर
कमाल प्रमाण१५ कि.ग्रॅ./एकर

आपल्या पिकांच्या विद्युत चालकता (EC) किंवा आवश्यक प्रमाणानुसार हे द्रावण सिंचनाच्या पाण्यात मिसळा. वापरण्याचे प्रमाण, पद्धत किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी घ्या. परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात आणि आमच्या उत्पादनांचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.

1
मॅगफॉस फर्टिगेशन तसेच पर्णीय फवारणीसाठी योग्य आहे. पिकांसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये पुरवणारे हे खत सर्व वाढीच्या टप्प्यांवर वापरता येते.
2
उच्च फॉस्फरस प्रमाणामुळे प्रारंभीच्या टप्प्यात मुळांची वाढ मजबूत करण्यासाठी तसेच फळधारणेसाठी विशेषतः शिफारस केले जाते.
3
फुलोऱ्याच्या अवस्थेत पर्णीय फवारणीद्वारेही मॅगफॉस वापरता येते.
4
अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.

मुख्यतः फर्टिगेशन वापरासाठी शिफारस केलेले

आमची डिजिटल साधने

पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा

ब्रँड विषयी माहिती

हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे

अधिक जाणुन घ्या

पीकची इतर उत्पादने पहा

आपल्या पिकांसाठी योग्य सिलेक्ट खतांची संपूर्ण श्रेणी जाणून घ्या

पीक

सर्वाधिक फॉस्फरस आणि पोटॅशियमची उपलब्धता

हाय पीक खत

0-44-44 उत्पादन पहा

पीक

पिकांना पाण्यात विद्रव्य फॉस्फरस व पोटॅशियमची गरज असताना उत्कृष्ठ पर्याय

पीकासिड 00-60-20 खत

0-60-20 उत्पादन पहा

पीक

विविध पिकांसाठी पूर्णपणे पाण्यात विद्रव्य खत

मोनो पोटॅशियम फॉस्फेट 0-52-34 खत

0-52-34 उत्पादन पहा

आणखी विषय पहा