उत्तम फर्टिगेशनद्वारे पिकांना संतुलित पोषण द्यायचे असेल, तर फर्टीफ्लो 13-40-13 हा उत्कृष्ठ पर्याय आहे. हे विद्रव्य खत अशा प्रकारे तयार केलेले आहे की मातीमध्ये नायट्रोजन अधिक काळ उपलब्ध राहतो आणि लीचिंगचा धोका कमी होतो. उच्च फॉस्फरस प्रमाणामुळे पिकांना या NPK खतामधून पुरेसे पोषण मिळते. यासोबतच लोह, झिंक आणि मॅंगनीज या सूक्ष्मअन्नद्रव्यांचे संतुलित प्रमाण असल्यामुळे ही काळजीपूर्वक तयार केलेली फॉर्म्युला पिकांच्या सर्व पोषण गरजा पूर्ण करते आणि सर्वांगीण, निरोगी वाढ सुनिश्चित करते.
पीकासिड तंत्रज्ञान
हे तंत्रज्ञान फॉस्फोरिक आम्लाचे फायदे आणि कार्यक्षमता यांना घन स्फटिक (क्रिस्टलाइन) खताच्या सुरक्षितता व सुलभतेसोबत एकत्र आणते. पीकासिड वापरल्यामुळे शेतीमध्ये तांत्रिक आम्लांच्या पारंपरिक वापराची गरज कमी होते, ज्यामुळे खत व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सोपी, सुरक्षित आणि परिणामकारक बनते. याच्या आम्लीय गुणधर्मांमुळे पीकासिड सिंचन प्रणालीमध्ये अडथळे कमी करण्यास मदत करते तसेच अन्नद्रव्यांचे शोषण वाढवते. ICL त्यांच्या अनेक पाण्यात विद्रव्य खतांमध्ये पीकासिड तंत्रज्ञानाचा वापर करते.
पीकासिड तंत्रज्ञानाविषयी अधिक जाणून घ्या
फर्टिगेशन खते
फर्टिगेशन ही एक पद्धत आहे ज्यामध्ये विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यात मिसळून पिकांचे उत्पादन वाढवले जाते. ही पद्धत खतांचे स्थान, वेळ आणि अन्नद्रव्यांच्या वापराची पद्धत नियंत्रित करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि लवचिक साधन आहे. यामुळे मातीची सुपीकता आणि पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार अचूक पोषण देता येते. ICL स्पेशालिटी फर्टिलायझर्स फर्टिगेशन तंत्रज्ञानामध्ये मानदंड निश्चित करते. या तंत्रज्ञानाचा मुख्य भर आम्लीय प्रभावावर आहे, जो पिकांना विविध फायदे प्रदान करतो.
- उच्च दर्जाच्या कच्च्या मालापासून तयार केलेले
- चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित प्रमाण समाविष्ट
- नायट्रोजन अधिक काळ मातीमध्ये उपलब्ध ठेवते, त्यामुळे शोषण सुधारते
- नायट्रेट लीचिंगचा धोका लक्षणीय रीत्या कमी करते
- एकसमान परिपक्वता, अधिक उत्पादन आणि उत्कृष्ट गुणवत्ता
- पूर्णपणे क्लोराईडमुक्त
- उच्च फॉस्फरस प्रमाण, उत्तम मुळांची वाढ आणि वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढते
१००० लिटर फील्ड स्टॉक सोल्यूशनसाठी शिफारस केलेले प्रमाण:
१००० लिटर पाण्यासाठी १००–१५० कि.ग्रॅ.
| किमान प्रमाण | १५ कि.ग्रॅ/एकर |
| कमाल प्रमाण | २५ कि.ग्रॅ/एकर |
आपल्या पिकांच्या विद्युत चालकता (EC) किंवा आवश्यक प्रमाणानुसार हे द्रावण सिंचनाच्या पाण्यात मिसळा. वापरण्याचे प्रमाण, पद्धत किंवा इतर कोणतेही घटक बदलण्यापूर्वी प्रथम लहान प्रमाणावर चाचणी घ्या. परिस्थितीनुसार परिणाम बदलू शकतात आणि आमच्या उत्पादनांचा वापर आमच्या नियंत्रणाबाहेर असल्यामुळे, कोणत्याही प्रतिकूल परिणामांसाठी ICL जबाबदार राहणार नाही.
अधिक शिफारसी आणि माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
आमची डिजिटल साधने
पोषक व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कॅल्क्युलेटर्स वापरा
ब्रँड विषयी माहिती
हे उत्पादन या ब्रँडचा भाग आहे
सूक्ष्म आणि प्रमुख अन्नद्रव्यांच्या सिद्ध मिश्रणांसह फर्टिगेशन खते, जी पिकांना थेट पोषणमूल्य प्रदान करतात.
अधिक जाणुन घ्या